HomeAnniversary WishesHappy Anniversary Dada and Vahini in Marathi

Happy Anniversary Dada and Vahini in Marathi

dada vahini anniversary wishes in marathi: जर तुम्ही भावाला आणि वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश पाठवण्यासाठी स्टेटस शोधत असाल तर आम्हाला आनंद होत आहे या स्टेटस तुमच्यासोबत शेअर करायला.

या लेखामध्ये तुम्हाला लेटेस्ट happy anniversary dada and vahini in marathi शुभेच्छा बघायला मिळतील जे नक्कीच त्यांना त्यांच्या या खास दिवशी आनंद देतील.


तुम्ही देवाकडे प्रार्थना करू शकता की त्यांची जोडी अशी आनंदी कायम राहो त्यांच्या जीवनात भरपूर प्रेम असो आणि प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी खास असो.


या दिवशी दादा वहिनीच्या संसाराला भरभराट यावी त्यांचे एकमेकांवरील प्रेम असेच नेहमी कायम रहावे, त्यांना यश समृद्धी व चांगले आरोग्य लाभावे अशी इच्छा प्रत्येक जण शुभेच्छांच्या माध्यमातून व्यक्त करत असतो.


भाऊ आणि वहिनीच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाच्या माध्यमातून तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे दाखवून देऊ शकता. ये खास happy anniversary dada and vahini in marathi शुभेच्छा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत जे तुम्हाला नक्कीच आवडतील.

Dada Vahini Anniversary Wishes in Marathi

हे बंध रेशमाचे एका नात्यात
गुंफलेले लग्न संसार आणि
जबाबदारीने फुललेले आनंदाने
नांदो संसार तुमचा दादा वहिनी
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा
कायम हीच आहे इच्छा तुमच्या
लग्नाच्या वाढदिवशी कायम
𝐻𝒶𝓅𝓅𝓎 𝒜𝓃𝓃𝒾𝓋𝑒𝓇𝓈𝒶𝓇𝓎!

सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची
साथ आपुलकी प्रेम वाढत राहो क्षणा
क्षणाला तुमच्या संसाराची गोडी बहरत
जाओ लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा
आणि आनंदाचा जावो दादा वहिनी
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा
प्रवास छानच होतो तुमच्या प्रवासाच्या
सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा
दिवस असाच अविस्मरणीय राहो
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला
जगता येवो लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा भाऊ आणि वहिनी.

समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा
दोघांचं प्रेम एकमेकांची ओळख
आहे तुमचा विश्वास लग्नाच्या
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर
वाहत राहो प्रार्थना आहे देवापाशी
की तुमचे आयुष्य सुख समृद्धीने
भरून जावो दादा वहिनी लग्नाच्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

विश्वासाचं नातं हे कधीही तुटू
नये प्रेमाचा धागा हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो दादा
वहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा देव तुमच्या जोडीला
आनंदात ऐश्वर्यात ठेवो तुमच्या
संसारात सुख समृद्धी लाभो तुमची
दिवसेंदिवस प्रगती होत राहो हीच
देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

लग्न म्हणे स्वर्गात ठरतात लग्नाचे
वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे
होतात हा शुभदिन आपणा उभयतांच्या
आयुष्यात वर्षानुवर्षे यावे हीच आमुची
शुभेच्छा! दादा वहिनी लग्नाच्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

प्रेम आणि विश्वासाची ही आहे
कमाई देव ठेवो तुम्हा दोघांना खूष
आदर सन्मानाने जगा हे नातं खूप
खूप लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा भाऊ आणि वहिनी.

Dada Vahini Anniversary Wishes in Marathi सारांश

दादा आणि वाहिनी दोघांनी हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात देव तुमची साथ देवो, तुम्हाला दोन्ही घरचे प्रेम भरभरून मिळो, सुख, समृद्धी, यश आणि वैभव तुमच्या दारी नांदो. आमच्या टीम कडून पण भाऊ वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


तर मित्रांनो या लेखामध्ये आम्ही भाऊ वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पहिले आहेत. जर तुमच्याजवळ happy anniversary dada and vahini in marathi शुभेच्छा असतील तर आमच्याशी नक्कीच शेअर करा.


तर मंडळी जर या dada vahini anniversary wishes in marathi शुभेच्छा तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि इतर मराठी स्टेटस वाचायला पण विसरू नका.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments