HomeWhatspp StatusSister Quotes Marathi: तुमच्या लाडक्या बहिणीसाठी स्टेटस

Sister Quotes Marathi: तुमच्या लाडक्या बहिणीसाठी स्टेटस

Sister Quotes Marathi: जर तुम्ही तुमच्या बहिणीसाठी लेटेस्ट sister quotes in marathi शोधत असाल तर हा ब्लॉग नक्की वाचा. बहीण हे एक विशेष प्रकारचे नातं आहे. ती तुम्हाला इतर कोणापेक्षा चांगले ओळखतात. ती तुमची बेस्ट मित्र म्हणून ओळखली जाते. जरी ती तुमच्याशी भांडत असली तरी तिचे तुमच्यावरचे प्रेम कधीच कमी होत नसते.

बहीण अशी व्यक्ती आहे जी तुमच्यासाठी नेहमीच संकटात पाठीशी खंबीरपणे उभी असते. तुमचा स्वतःवर विश्वास नसला तरीही ती तुमच्यावर नेहमी विश्वास ठेवते. बहीण ही एक अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला इतर कोणाहीपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखते आणि जेव्हा तुम्ही पडता तेव्हा ती तुम्हाला उचलण्यासाठी नेहमीच असते.

जर तुमची बहीण असेल तर तुम्ही भाग्यवान असाल, तिची काळजी घ्या आणि तुमचे तिच्यावर किती प्रेम आहे हे तिला या emotional sister quotes in marathi च्या माध्यमातून सांगा.

Sister Quotes Marathi

सासरी जाताना मिठी मारून रडणारी
नाही तुला आता ओरडणार असं रडत
रडत म्हणणारी प्रत्येकाच्या आयुष्यात
अशी एक तरी बहीण असावी जीवापाड
जपणारी आणि खूप प्रेम करणारी.

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे भाऊ
माझा यशाने न्हाऊ दे राखी शिवाय
काही नाही माझ्याकडे म्हणून रक्षणाचे
वचन मागते तुझ्याकडे हीच आहे माझी इच्छा.

रडवायचं कसं आणि रडून झाल्यावर
बहिणीला हसवायचं कसं हे
फक्त भावालाच जमत.

मायेचं साजूक तूप, आईचं दुसरं रूप
काळजी रूपी धाक, प्रेमळ तिची हाक
कधी बचावाची ढाल तर कधी मायेची
उबदार शाल भरलेलं आभाळ रितं कराया
तिचीच ओंजळ पुढे येई जागा जननीची
भरून काढाया देवाने निर्मिली आईनंतर ताई.

मानलेल्या बहीण भावाचं नात हे
रक्ताचं नसल तरी ते रक्ताच्या
नात्यापेक्षाही खूप श्रेष्ठ असतं जे
फक्त सुखात नाही तर दुःखात साथ
देत तेच खर बहीण भावाचं नात असत.

माझी बहीण लाडाची जणू वटवृक्षाची
सावली माया ममतेनं भरलेली ती
माझी मेवा आणि मिठाई.

मनात ठेवण्याऐवजी मन मोकळे करण्याची
एक हक्काची जागा म्हणजे बहीण.

भावाबहिणीचं प्रेम म्हणजे तुझं
माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना.

भाऊ कितीही नालायक असो
बहिणीसोबत कितीही भांडण करत
असो परंतु,बहिणीला तो खूप
जीव लावत असतो पण दाखवत नाही.

भाऊ आणि बहिणीच्या प्रेमात बस
एवढाच अंतर असतो रडवून हसवतो
तो भाऊ असतो आणि रडवून ती
स्वतःही रडते ती बहीण असते.

Emotional Sister Quotes in Marathi

बहीण ही फक्त बहीण
नसते तर ती तुमची
सुख दुःखाची साथीदार असते.

बहीण छोटी असो की मोठी
तिला नेहमीच आपल्या
भावाची काळजी असते.

बहीण कशीही असुद्या ती
भावाच्या हृदयाचा तुकडा असते.

प्रत्येक बहिणीमध्ये
एक मैत्रीण आणि
आई लपलेली असते.

नात हे प्रेमाचं नितळ अन
निखळ मी सदैव जपलंय
हरवलेले ते गोड दिवस त्यांच्या
मधुर आठवणी आज सार सार
आठवतंय हातातल्या राखीसोबत
ताई तुझं प्रेम मी साठवलय.

देव पूर्ण जगाची काळजी घेऊ
शकत नाही म्हणून त्याने प्रत्येक
घरात आई दिली असावी त्याचप्रमाणे
आई आपल्या जीवनाच्या प्रत्येक
भागाची काळजी घेऊ शकत नाही
म्हणून तिने आपल्याला बहीण दिली असावी.

ताई हे नुसतं नाव नाही त्याच्या
आयुष्याच गाव आहे आईनंतर तिच्यामुळे
त्याच्या आयु्ष्याला भाव आहे.

जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ
असते नेहमी माझ्या मनाला
ताईला भेटण्याची आस असते.

कितीही रागावलीस ताई तरी
बंध रेशमाचे तोडू नको वेडा आहे
तुझा भाऊ त्याला एकटं सोडू नको.

कधी भांडते तर कधी रुसते
तरीही न सांगता प्रत्येक गोष्ट
समजते हो गोष्ट फक्त बहिनच ठेवते.

Two Sister Quotes in Marathi

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
असेल हातात हात अगदी प्रवासाच्या
कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ
माझ्या जीवनाचा हरेक क्षण तुझ्या
रक्षणासाठी सरलेला असेल राखीच्या
प्रत्येक धाग्यासोबत विश्वासच
तो सदैव उरलेला असेल.

आपल्या बहिणीसारखी दुसरी
मैत्रीण कोणच नसते नशीबवान
असतात ते ज्यांना बहीण असते.

आईसमान भासते मज मोठ्या
बहिणीची माया वटवृक्षाप्रमाणे सतत
देते ती मजवर तिची छाया न सांगताच
जी घेते माझ्या मनाचा ठाव आयुष्यभर
माझ्या ओठी माझ्या ताईचे नाव.

आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव
टाकणारी कोणी व्यक्ती असेल
तर ती म्हणजे बहीण असते.

असं हे भाऊ बहिणीचं नातं
क्षणात हसणारं, क्षणात रडणारं
क्षणात मारणारं, क्षणात मार खाणारं
क्षणात भांडणारं, क्षणात रागवणारं
पण किती गहर प्रेम असतं हे दोघांच
असं असतं हे बहीण भावाचं अतूट नातं.

Sister Quotes in Marathi सारांश

sister love quotes in marathi हे बहिणींमधील विशेष बंधन साजरे करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. जर तुमची बहीण असेल तर तुम्ही तिच्यावर किती प्रेम आणि कौतुक कराल हे तिला बहिणीसाठी स्टेटस मधून नक्की सांगा.

ती तुमच्या आयुष्यातील एक खास व्यक्ती आहे आणि तिचे प्रेम ही एक मौल्यवान भेट आहे जी तुम्ही कधीही विसरणार नाही.

मला आशा आहे की या sister shayari marathi लेखामुळे तुम्हाला बहिणींमधील विशेष बंधनाची प्रशंसा करण्यात मदत झाली आहे. आपल्याकडे काही प्रश्न किंवा टिप्पण्या असल्यास, कृपया आम्हाला मोकळ्या मनाने कळवा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments