HomeBirthday WishesBirthday Wishes for Wife in Marathi

Birthday Wishes for Wife in Marathi

Bayko Birthday Wishes in Marathi

संपूर्ण घराची काळजी घेणाऱ्या
आणि आपल्या मनमिळाऊ स्वभावाने
संपूर्ण घराला स्वर्गाहुनी सुंदर
बनविणाऱ्या माझ्या बायकोला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

या आयुष्याच्या प्रवासात अनेक
लोक बदलून गेलेले पाहिले पण
फक्त तू आयुष्यात आल्यावर
आयुष्य बदलून गेलेले पाहिले
माझ्या आयुष्यात सुख
आणणाऱ्या माझ्या पत्नीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मी खवळलेला महासागर तू शांत
किनारा आहेसमी उमलणारे फूल
तू त्यातला सुगंध आहेस मी एक
देह तू त्यातला श्वास आहेस बायको
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या श्वास घेण्याचे कारण आहेस
तू माझ्या आयुष्याची सुरुवात
आणि शेवट आहेस तूमाझी बायको
माझ्या मनातील राणी आहेस तू आजचा
दिवस खरंच खूप खास आहे माझ्या
प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटात
माझ्या सोबत असणारी स्वभावाने
अत्यंत प्रेमळ संपूर्ण घराला सांभाळून
घेणारी माझी बायको तुला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

माझा श्वास आणि तू या गोष्टी
माझ्यासाठी एकच आहेत
बायको तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.

तू साथ असेल तर त्या
जगण्याला अर्थ आहे नाहीतर
माझं सगळे जीवन व्यर्थ आहे
आय लव यु बायको तुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्या डोळ्यात कधी अश्रू न
वहावेमनाने नेहमी तुझ्या जवळ
असावे पूर्ण होतील तुझ्या मनातील
सर्व इच्छा बायको तुला वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा.

जीवनातील प्रत्येक सुख-दुःखात
तू साथ माझी दिलीस मला
नेहमी आनंदी ठेवले माझी काळजी
घेतली अशा माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.

जसा पाण्याविना मासा जगू
शकत नाही तसा मी तुझ्याशिवाय
जगू शकत नाही बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments