HomeBirthday WishesBirthday Wishes for Sister in Marathi

Birthday Wishes for Sister in Marathi

Sister Birthday Wishes in Marathi

हिऱ्यामधला हिरा कोहिनूर आहेस
तू माझ्या मनातलं सगळं ओळखणारी
माझा सांताक्लॉज आहेस तू ताई तुला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

संपूर्ण जगातील सर्वात प्रेमळ
आणि काळजी घेणाऱ्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या मनातलं गुपित मी
कोणलाही न सांगता ओळखणाऱ्या
माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा तू केवळ माझी
बहीणच नाहीस तर एक चांगली
मैत्रीण आहेस. तुझ्यासारखी बहिण
माझ्याकडे असण्याचा मला अभिमान
आहे बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मनुष्य प्रत्येक वेळी परफेक्ट नसतो
परंतु ताई तू माझ्यासाठी नेहमीच
परफेक्ट आहेस तुझ्यामुळे माझे
आयुष्य खूप सुंदर बनले आहे नेहमी
माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद
ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बाबांची परी ती अन् सावली
जणू ती आईची कधी प्रेमळ कधी
रागीट ही कविता आहे माझ्या ताईची
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य
कधीच कमी होऊ नये कारण तू
आयुष्यातील सर्व सुखासाठी पात्र
आहेस धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी
राहिल्याबद्दल माझ्या गोड बहिणीला
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

तुझा वाढदिवस म्हणजे घरच्यांसाठी
एक पर्वणीच असते, वाढदिवसाच्या
महिनाभर आधीपासून तयारीला
सुरूवात होते. ताई, अशा तुझ्या जंगी
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.

कधी हसणार आहे कधी रडणार आहे
मी सारी जींदगी माझी तुला जपणार आहे
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

एखाद्या परिकथेला शोभावी अशी
सुंदर माझी ताई, काहीच दिवसांमध्ये
सासरी जाऊन नांदेल, माझ्या मनावर
हळूवार फुंकर घालणारी माझी ही
परी मला मग कधी मिळेल
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments